|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शिरंगेत केरळीयनांचे अतिक्रमण

शिरंगेत केरळीयनांचे अतिक्रमण 

हटावसाठी 26 पर्यंत मुदत, अन्यथा उपोषण

प्रतिनिधी / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्मयातील शिरंगे बुडीत क्षेत्रातील परप्रांतीय केरळीयनांनी अतिक्रमण करून हडप केलेली जमीन मुक्त करून मिळण्यासाठी 27 एप्रिलला शिरंगे येथे कार्यकर्ते व अन्यायग्रस्त कुटुंबियांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा मनसेचे दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी दिला आहे.

लोबो यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर, अन्यायग्रस्त शेतकरी नकुळ महादेव गवस, पांडुरंग महादेव गवस, तुकाराम महादेव गवस व अशोक लक्ष्मण गवस यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिरंगे येथील जमीन नकुळ महादेव गवस, पांडुरंग महादेव गवस, तुकाराम महादेव गवस व अशोक लक्ष्मण गवस या माजी सैनिक व शेतकऱयांची वडिलोपार्जित मिळकतआहे. सदर जमिनीचे खरेदीखत झालेले आहे. या जमीन मिळकतीच्या संपूर्ण क्षेत्राचे धडेवाटप झालेले होते. त्याप्रमाणे त्यांना त्या क्षेत्राची नक्कल मिळाली. त्याप्रमाणे सर्व जमिनीत त्यांची कसवट, भोगवट, वहिवाट आजतागायत सुरू आहे. सदर जमीन मिळकतीत चाळीस वर्षांपासूनची राखीव जंगली झाडे तसेच काजू, फणस, आंबा, साग इत्यादी झाडे मोठय़ा प्रमाणात होती. सदर झाडे त्यांनी दांडगाईने तोडून गरीब शेतकऱयांचे नुकसान केले. त्याबाबत जाब विचारण्यास गेल्यावर त्यांनी व त्यांच्या स्थानिक नेत्यांना हाताशी धरून या शेतकऱयांना जीवे मारण्याची धमकी देऊन बांदा पोलीस ठाण्यात खोटी फौजदारी तक्रार दाखल केली.

यांदभांतील प्रांताधिकाऱयांकडील सर्व केसेस शेतकऱयांच्या बाजूने झालेल्या आहेत. तसेच तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेले मूळ शिरंगे गाव विस्थापित धरणग्रस्त माजी सैनिक, ज्ये÷ नागरिक यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱयांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अतिक्रमणाच्या ठिकाणी मोठमोठी रबराची झाडे आढळली, असेही लोबो यांनी म्हटले आहे.

26 एप्रिलपर्यंत शेतकऱयांची जमीन मिळकत त्यांच्या ताब्यात द्यावी. अन्यथा 27 एप्रिलला शिरंगे येथे मनसेचे कार्यकर्ते व अन्यायग्रस्त शेतकऱयांच्या कुटुंबियांसोबत बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Related posts: