|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पाक संघात झमान, इमाम यांचा समावेश

पाक संघात झमान, इमाम यांचा समावेश 

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकचा क्रिकेट संघ मे महिन्यात इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयासाठी पाकच्या 16 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. पाक संघामध्ये नवोदित फलंदाज फक्र झमान, इमाम उल हक, उस्मान सल्लाउद्दीन आणि सादअल्ली या चार नवोदितांचा पाक कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज वहाब रियाजला वगळण्यात आले असून शान मसूदचा दुखापतीमुळे निवड समितीने विचार केला नाही.

या महत्त्वाच्या दौऱयासाठी पाक निवड समितीने अनुभवी खेळाडूपेक्षा नवोदितांना अधिक संधी दिली आहे. यासिर शहाच्या गैरहजेरीत शदाब खानचा संघात समावेश  करण्यात आला. हॅरीस सोहेलने संघातील आपली जागा राखली आहे. निवडण्यात आलेल्या पाक संघाच्या सराव शिबिराला येत्या बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. 11 मे रोजी पाकचा संघ आयर्लंडला रवाना होईल. आयर्लंड आणि पाक यांच्यात एकमेव कसोटी सामना होणार आहे. या सामन्यानंतर पाकचा संघ इंग्लंडमध्ये दाखल होईल. उभय संघात दोन कसोटी सामने आयोजित केले आहेत. पहिली कसोटी लॉर्डस्वर 24 मे पासून तर दुसरी कसोटी लिडस् येथे 1 जूनपासून खेळविली जाईल.

पाक कसोटी संघ- सर्फराज अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अझहर अली, इमाम उल हक, समी अस्लम, हॅरीस सोहेल, बाबर आझम, फक्र झमान, साद अली, आसद शफीक, उस्मान सलाउद्दीन, शदाब खान, मोहम्मद आमीर, मोहम्मद अब्बास, हसन अली, राहत अली आणि फहिम अश्रफ.

Related posts: