|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » राष्ट्रकुल स्पर्धेत रेल्वेच्या खेळाडूंचे भरघोस यश

राष्ट्रकुल स्पर्धेत रेल्वेच्या खेळाडूंचे भरघोस यश 

वृत्तसंस्था/ मुंबई

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची कामगिरी दर्जेदार झाली. भारताने या स्पर्धेत 26 सुवर्णपदकांसह 66 पदकांची लयलूट केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया भारतीय रेल्वेच्या खेळाडूंनी 26 पैकी 10 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. रेल्वे मंडळातर्फे या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे.

रेल्वेच्या ऍथलीटस्नी या स्पर्धेत 10 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कास्यपदकांची कमाई केली आहे. रेल्वे स्पोर्टस् मंडळाचे 49 ऍथलीटस् या स्पर्धेत सहभागी झाले होते. वेटलिफ्टींग, कुस्ती, हॉकी, ऍथलेटिक्स, बास्केटबॉल, जिम्नॅस्टिक या विविध क्रीडा प्रकारात रेल्वेच्या खेळाडूंनी आपला सहभाग दर्शविला होता. रेल्वे क्रीडा मंडळाच्या सातही मल्लांनी कुस्तीत पदके मिळविली आहेत. सुशिलकुमार, राहुल आवारे, सुमीत मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक तर साक्षी मलिक व किरण बिश्नोई यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले. वेटलिफ्टींगमध्ये रेल्वेच्या सहा वेटलिफ्टर्सनी पदकांची कमाई केली. मिराबाई चानू, संजीता चानू, पूनम यादव, सतीश शिवलिंगम आणि आर.व्ही. राहूल यांनी सुवर्णपदके मिळविली असून प्रदीप सिंगने रौप्यपदक पटकाविले. रेल्वेचा मल्ल मनोजकुमारने तसेच थाळीफेकपटू नवजित धिल्लनने कांस्यपदक मिळविले आहे.

Related posts: