|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत

तेजस्विनी सावंतचे पुणे विमानतळावर उत्साहात स्वागत 

पुणे / प्रतिनिधी

 ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत हिचे पुणे विमानतळावर पुणेरी पगडी घालून मोठय़ा उत्साहाने स्वागत करण्यात आले. तेजस्विनी सावंत ही मुळची कोल्हापूरची असून, पुण्यात ती शासकीय सेवेत काम करते.

 2010 मध्ये झालेल्या काँमनवेल्थ युथ मध्येही तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्यानतंर तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तेजस्विनी म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सराव करते. रविवारी सकाळपासून अनेक क्रीडाप्रेमी पुणे विमानतळावर तेजस्विनीच स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी विजयी मिरवणूकीत उत्साही क्रीडाप्रेमींनी भारत माता की जय नावाने घोषणा दिल्या. तेजस्विनीचे पती व कुटुंबीय मिरवणूकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठय़ प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 महाराष्ट्र क्रीडा विभागातर्फे तिचा सत्कार करण्यात आला. मुलींनी क्रीडाक्षेत्रात पुढे आले पाहिजे. राष्ट्रकुलनंतर आता पुढील पदक हे ऑलम्पकिचेच असेल असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला. तेजस्विनी मूळची कोल्हापूरची असून तिचे वडील रवींद्र सावंत नौदलामध्ये अधिकारी होते. तेजस्विनीला 2011 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ती गेल्या 14 वर्षांपासून नेमबाजी क्रीडाप्रकारात प्रतिनिधीत्व करत आहे.

Related posts: