|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उर्वरीत आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच

उर्वरीत आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच 

आमदार गणपतराव देशमुख यांचे प्रतिपादन

 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

धनगर समाज आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक दृष्टया मागसलेला आहे. इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करणे गरजेचे आहे. यशवंत सेनेतर्फे यशवंतराव होळकर यांच्या नावाने दिलेल्या जीवनगौरव पुरस्कारामधून उर्मी मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित आयुष्य धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खर्ची घालणार असून यासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे प्रतिपादन आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.

  यशवंत युवा सेनेतर्फे यशवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यातंर्गत आमदार गणपतराव देशमुख यांना यशवंतराव होळकर जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच यावेळी धनगर समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडी, माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी आमदार प्रकाश शेंडगे, अमरजीतराजे बारगळ, भुषणसिंह होळकर, प्रा. शिवाजी दळणार, रेणुका शेंडगे, बबन रानगे आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवातंर्गत शाहीरी पोवाडा, ओवी, मर्दानी खेळ आणि गजनृत्याचे सादरीकरण करत धनगर समाजाच्या सांस्कृतिचे दर्शन घडविण्यात आले.

  पुरस्काराला उत्तर देताना आमदार देशमुख म्हणाले, धनगर समाज हा जास्त करुन डेंगराळ भागात राहतो. उदरनिर्वाहासाठी हा समाजा घोडय़ावरच आपला संसार थाटून गावोगावी फिरत असातात. त्यामुळे हि एकप्रकारे भटकी जमातच असल्याने धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश होणे आवश्यक आहे.  इतर सामाजाच्या बरोबरीने येण्यासाठी धनगर समाजाला आरक्षण मिळाणे गरजेचे आहे.

  आमदारकीच्या 55 वर्षांच्या कालावधीत केवळ साडेतीन वर्ष सत्ताधारी बाकावर बसलो. उर्वरीत काळ विरोधक म्हणून काम केले. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विधानसभेत नेहमीच प्रश्न मांडत आलो आहे. भविष्यातही मांडत राहणार आहेच पण लोकशाहीमध्ये संख्याबळावर प्रश्न सुटतात. पण हे संख्याबळ नसल्याने येथ आरक्षणाची केवळ घोषणा बाजीच होते. त्यामुळे आरक्षणासाठी प्रचंड लोकांदोलन उभारण्याची गरज आहे. या लोकशाहीमध्ये एक दिवस कष्टकरी जनतेचे राज्य येणार, यावर विश्वास ठेवूनच राजकारणात टिकून आहे. त्यामुळे आता उर्वरित आयुष्य समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खर्च करणार आहे. यासाठी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचेही आमदरा देशमुख यांनी याप्रसंगी सांगितले.

  माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, सत्ताधारी भाजप सरकारने निवडणुकीपुर्वी धनगर समजाला सत्तेवर आल्यानंतर लगेचच आरक्षण मिळवून देवू असे आश्वासन दिले होते. आरक्षणाचे गाजर दाखवत समाजाची मते मिळवली. पण आज चार वर्ष होत आली तरी सत्ताधारी सरकार समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे अगामी निवडणूकांमध्ये सरकारला समाजाची ताकत दाखवून देण्याचा इशारा दिला.

Related posts: