|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विटय़ात दोन लाखांचे दागिने लंपास

विटय़ात दोन लाखांचे दागिने लंपास 

प्रतिनिधी/ विटा

येथील बसस्थानकावरून एसटी प्रवास करीत असताना सुमारे शंभर ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोकड असा सुमारे 2 लाख 7 हजार 800 रूपये किंमतीचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला. ही घटना शनिवार 14 एप्रिल रोजी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत स्नेहल प्रसाद शिंदे (30, रा. देविखिंडी, ता. खानापूर) यांनी वर्दी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, देविखिंडी येथील स्नेहल प्रसाद शिंदे या बेंगलोर येथे वास्तव्यास आहेत. पाटण तालुक्यातील चाफळ येथे माहेरला  सुट्टीसाठी मुलगी प्रतिक्षा हिच्यासह स्नेहल देविखिंडीहून निघाल्या होत्या. शनीवार 14 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्या देविखिंडीहून विटय़ात आल्या. दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास त्या विटा-पुणे एसटीत बसल्या. एसटीत बसल्यानंतर पर्सची चेन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पाहणी केली असता पर्समधील 50 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र, 20 ग्रॅमचे नेकलेस, 10 ग्रॅमची कर्णफुले, 12 ग्रॅमचे मिनी मंगळसूत्र, 5 आणि 4 ग्रॅमची अंगठी, एक ग्रॅमची नाकातील नथ असा सुमारे 101 ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज, साडेतीन भाराचे पैंजण आणि 6 हजार रूपये रोख असा एकूण सुमारे 2 लाख 7 हजार 800 रूपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला, असे शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.

त्यानंतर शिंदे यांनी घरी याबाबत माहिती दिली. रविवारी दुपारी त्यांनी याबाबत विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. ए. माने करीत आहेत.

 

Related posts: