|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गोळवली टप्पा येथील अपघातात महिला गंभीर जखमी

गोळवली टप्पा येथील अपघातात महिला गंभीर जखमी 

वार्ताहर / संगमेश्वर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या गोळवली टप्पा येथे आयशर टेम्पो व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात रविवारी सकाळी 11.10 वाजण्याच्या दरम्यान घडली.

दुचाकीवरील गंभीर जखमी महिला मंगला सयाराम देवांगण (45,रा. माळनाका) हिला संगमेश्वर येथील ग्रामीण हॉस्पीटल येथून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. अक्षय महेश सुतार (20, रा. माळनाका) मावशी मंगला देवांगण हिला घेवून संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे निघाला होता. संगमेश्वरजवळच्या गोळवली टप्पा येथे आला असता रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱया आयशर टेम्पोची व दुचाकीची धडक होवून दुचाकीवरील मंगला देवांगण या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्याचे समजताच संगमेश्वर 108 रुग्णवा†िहकेचे चालक गणेश पाथरे व डॉ. शहाजी मोटे तसेच रुग्णवाहिका चालक प्रसाद सप्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी देवांगण यांना प्राथमिक उपचारानंतर रत्नागिरी व अधिक उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले आहे.

Related posts: