|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फलटणमधील तीन दुकानांना आग

फलटणमधील तीन दुकानांना आग 

प्रतिनिधी/ फलटण

फलटण शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत शिंगणापूर रोड येथील रामराजे शॉपिंग सेंटर समोरील साई कॉस्मेटिक या दुकानाला शनिवारी मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत साई कॉस्मेटिकसह शेजारच्या दोन दुकानाचे 4 ते 5  लाख रुपयांचे नुकसान झाले. याची नोंद शहर पोलीस ठाण्यात लखन सतीश ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन झाली आहे. दरम्यान, शेजारच्या दुकानातील गॅस टाक्या बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शिंगणापूररोड येथील खासगी जागेतील या साई कॉस्मेटिकला शॉर्टसर्किटमुळे शनिवार दि. 14 रोजी रात्री आग लागल्याचे लक्षात येताच शेजारच्या घोलप कुटुंबातील लोकांनी व स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. तसेच साई कॉस्मॅटिकचे मालक सतीश ठोंबरे यांना फोनवरून सदरची माहिती देण्यात आली. दरम्यान, फलटण नगरपरिषद अग्निग्नशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही आग मोठय़ा प्रमाणात असल्याने पहाटे 5 पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नग्निशामक दल व परिसरातील लोक प्रयत्नशील होते. या आगीत साई कॉस्मेटिक पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शेजारच्या ओम रेफ्रिजरेटर व गणेश ऑटो गॅरेजला आगीची झळ पोहोचली आहे.

रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवुन आग विझविण्यासाठी मदत केली. पोलिसांनी नुकसानीची पाहणी केली असून तिनही दुकानाचे पंचनामे केले आहेत. आग लागल्यानंतर लगेच शेजारी राहत असलेल्या लोकांनी शेजारच्या दुसऱया दुकानात गॅसच्या टाक्या असल्याचे अग्निग्नशामक दलाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शेजारच्या दुकानाचे शटर कटावणीने उचकटून त्यामधील गॅसच्या टाक्या बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

रात्री उशिरापर्यंत तीनही दुकानांचे पंचनामे करण्याचे काम सुरु होते. या आगीत साई कॉस्मॅटिकमधील कॉस्मेटिक साहित्य, सलूनसाठी लागणारे साहित्य तसेच इतर फर्निचर व पत्र्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे शेजारच्या दोन्ही दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. नगरपरिषद अग्नग्निशमन दल पहाटे 5 वाजेपर्यंत आग आणण्याचे काम करीत होते. पाण्याचे मोठे 3/4 टँकर्स मागवून अग्नग्निशमन दलाला सतत पाण्याचा पुरवठा करण्यात आला. तरीही आग आटोक्यात आणण्यात अग्नग्निशमन दलाची दमछाक झाली. 

Related posts: