|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रेमीयुगलाची गळफास घेवून महाबळेश्वरात आत्महत्या

प्रेमीयुगलाची गळफास घेवून महाबळेश्वरात आत्महत्या 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

पलुस (जि. सांगली) येथील तेजश्री रमेश नलावडे (वय 23) व अविनाश आनंदा जाधव (वय 27 रा. दोघेही दुधोंडी, ता. पलुस, जि. सांगली) या प्रेमी युगलाने येथील केटस् पॉईंट परिसरात जंगलातील एका झाडाला ओढणीच्या मदतीने गळफास घेवुन आत्महत्या केली. याबाबत वसंत जाधव या टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहुन ठेवली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पुढील तपास पाचगणी पोलीस करीत आहेत. 

  रविवारी सकाळी एक टॅक्सीने हे प्रेमी युगल महाबळेश्वरपासुन पाच किलोमीटर  अंतरावर असलेल्या केटस् पाँईटवर पोहचले. तेथे मुख्य रस्त्यापासुन 100 मिटर अंतरावर एका झाडाला जवळ जवळ ओढणीच्या मदतीने दोघांनी गळफास घेतला. टॅक्सीचालक या भागात गेला असता त्यास दोघांनी गळफास घेतल्याचे दिसुन आल.s त्यांनी पोलिसांना खबर देताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अवकाळी गावचे स्थानिक नागरिक, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व सहय़ाद्रि टेकर्सच्या मदतीने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरविले व शवविच्छेदनासाठी पांचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रवाना केले.

घटनास्थळावर पाठीवर अडकाविण्याच्या दोन सॅक मिळाल्या. यामध्ये दोघांची कपडे व इतर साहित्य होते. तसेच आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी लिहलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली तर तेजश्रीचे आधार कार्डही सापडले. त्यामुळे दोघांची ओळख पटण्यास मदत झाली. 

दरम्यान, तेजश्री रमेश नलावडे ही 14 तारखेस कॉलेजला जाते असे सांगुन घरातुन बाहेर पडली होती. ती उशिरापर्यंत घरी न आल्याने मुलीच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी हरविल्याची फिर्याद दाखल केली होती तर अविनाश जाधव हा सांगली येथील एका सहकारी बँकेत कामाला होता. दोघेही जवळ जवळ राहण्यास होते. दोघांचे प्रेमसंबंध त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हते म्हणुन त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीत आम्ही आमच्या इच्छेने हा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहु शकत नाही. आम्ही पळुनही जावु शकत होतो, परंतु तुमचा विरोध पत्करून आम्हाला जीवन जगायचे नव्हते, असे करून आम्ही सुखी राहु शकत नव्हतो, म्हणुन आम्ही आमचे आयुष्य संपवित आहोत. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नका. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना त्रास देवु नये, भांडण करू नये नाहीतर आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही, असा पत्रात मजकुर आहे. व शेवटी तुमचे अविनाश आनंदा जाधव व सौ. तेजश्री अविनाश जाधव अशी नावे आहेत. 

 दोघांनी आत्महत्या केली की, प्रथम तिला झाडाला लटकावुन नंतर अविनाश याने आत्महत्या केली. याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Related posts: