|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दत्ताराम काणेकर स्मृती नाटय़महोत्सवात कलाकारांना गौरविणार

दत्ताराम काणेकर स्मृती नाटय़महोत्सवात कलाकारांना गौरविणार 

प्रतिनिधी/ पेडणे

दत्ताराम काणेकर हे एक सच्चे व प्रामाणिक पत्रकार तर होतेच पण ते कलाकार म्हणूनही आयुष्य जगले. अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कामही त्यांनी केले आहे. पत्रकारिता, साहित्य, सहकार व समाजकारण या क्षेत्रात ते सतत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने सतिया देवी नाटय़मंडळ नईबाग व स्वामी ज्ञास यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 19 ते शनिवार 21 एप्रिल दरम्यान तीन दिवशीय नाटय़महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राज्यातील नाटय़कलाकारांचा व स्थानिक पत्रकारांचाही गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती नईबाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाटय़महोत्सवाचे कार्याध्यक्ष राजमोहन शेटये यांनी दिली.  

प्रसिद्ध संगीत शिक्षक महानंद कोठावळे, साईदास स्वार, सूर्यकांत मळीक, शरद कुडव, बाळा पिळर्णकर, प्रेमनाथ गडेकर, जयराम पिळर्णकर, पंचसदस्य राकेश स्वार, चंद्रकांत सांगळे, सुरेश तारी, पुंडलिक पिळर्णकर व चंद्रकांत सावळ आदी पर्घ्कार परिषदेला उपस्थित होते. नईबाग येथील सतियादेवी देवस्थानजवळ होणाऱया या नाटय़महोत्सवाच्या तिन्ही दिवशी सायं. 7 वाजता राज्यातील प्रसिद्ध 10 नाटय़कलाकार, पेडणे तालुक्यातील 10 व स्थानिक 10 नाटय़कलाकारांचा सन्मान करण्यात येईल. त्यानंतर रात्री ठिक 8 वाजता नाटय़प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. पेडणे नईबागचे सुपुत्र प्रसिद्ध दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या तीन उत्कृष्ट नाटय़कृती या महोत्सवात सादर होणार आहेत. यातील शेवटचा नाटय़प्रयोग स्थानिक कलाकार सादर करतील, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. 

19 रोजी संगीत ‘सिद्धारुढ’

गुरुवार 19 रोजी सायं. 7 वाजता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. धारगळ जिल्हा पंचायत सदस्य तुकाराम हरमलकर व सरपंच व पंचसदस्य यावेळी उपस्थित असतील. उद्घाटन सत्रानंतर स्थानिक पत्रकार व 10 राज्यस्तरीक कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. सत्कारमूर्तींमध्ये पत्रकार प्रकाश तळवणेकर, निवृत्ती शिरोडकर व उमेश गाड तर राज्यस्तरीय कलाकार म्हणून किरण नाईक (नेपथ्य), राजीव शिंदे (दिग्दर्शक), सम्राज्ञी मराठे (अभिनय), मिनिन आरवजू (तियात्र), शशिकांत पुनाजी (लेखन), डॉ. विजय थळी (अभिनय), राजेश पेडणेकर (अभिनय), दिनकर पणशीकर (गायन), सतिश गावस (प्रकाश योजना) व महानंद कोठावडे (संगीत दिग्दर्शन) यांचा सामावेश आहे. त्यानंतर ठिक 8 वाजता भूतनाथ बाल कला मंडळ सावंतवाडा आमोणा या संस्थेतर्फे संगीत ‘सिद्धारुढ’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल.

20 रोजी ‘ताजमहलाचे टेंडर’ नाटय़प्रयोग

शुक्रवार 20 रोजी सायं. 7 वाजता पेडणे तालुक्यातील 10 यशस्वी कलाकारांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी उद्घाटक म्हणून ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर उपस्थित असतील. प्रमुख पाहुणे म्हणून तोरसे जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, सरपंच व पंचसदस्य उपस्थित असतील. तुये येथील पलादीन दी तुयेम (तियात्र), धारगळ येथील नवसो आरोंदेकर (अभिनय), केरीतील मिलिंद केरकर (संगीत नाटक), हरमल येथील सूर्या वस्त (अभिनय), विर्नोडा येथील विलास परब (दिग्दर्शक), मोरजी येथील ध्रुव कुडाळकर (लेखन), चांदेल येथील अनंत गावस (अभिनय), मालपे येथील भानुमती मालपेकर (अभिनय), तांबोसे येथील नाना आसोलकर (संगीत दिग्दर्शन), मांद्रे येथील दिलीप मांद्रेकर (रंगभूषा) या कलाकारांना यावेळी गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ठिक 10 वाजता भार्गवी थिएटर पर्वरी या संस्थेतर्फे ‘ताजमहलाचे टेंडर’ हा नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल.

Related posts: