|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शीख बांधवांनी साजरी केली ‘बैसाखी’

शीख बांधवांनी साजरी केली ‘बैसाखी’ 

बेळगाव / प्रतिनिधी

साद संगत गुरुद्वारा समिती बेळगावतर्फे रविवारी बैसाखी साजरी करण्यात आली. यानिमित्त शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दि. 13 रोजी सकाळी अखंड पाठ झाला. सायंकाळी रेहराससाहीब यांचा पाठ झाला. दि. 14 रोजी सकाळी माधसाहिब यांचा अरदास पाठ, सायंकाळी रेहसास साहिब यांचा पाठ व सिमरनजीत सिंग खन्नावाले यांचे शबद कीर्तन झाले.

रविवारी बैसाखीनिमित्त सकाळी 9 वा. अखंड पाठ झाला, त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व स्थानिक समितीतर्फे शबदकीर्तन झाले. त्यानंतर पंजाबच्या सिमरनजीत सिंग खन्नावाले यांचे अबदकीर्तन झाले. सतनाम खुराणा यांनीही 350 वर्षांपूर्वी याच दिवशी खालसा पंथ स्थापन झाला होता. कडा, केस, कंगवा, कच्छ व कृपाण म्हणजे पाच ‘क’ वर हा समाज भर देतो व या वस्तू धारण करतो. त्यामुळे बैसाखी साजरी करण्यात येते.

सर्व शीख समाज यानिमित्त गुरुद्वारात एकत्र येऊन सेवा बजावतो. बैसाखी उत्सवाला सीआरपीएफचे कमांडर प्रीत मोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैसाखी उत्सव यशस्वी करण्यासाठी गुरुदास समितीचे अध्यक्ष कर्तारसिंग भाटला, कार्याध्यक्ष खुराणा, सचिव सुरिंदरसिंग व खजिनदार सुरेंद्रसिंग पाल उर्फ विंकी यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले. लंगर म्हणजेच महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.  

Related posts: