|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » …मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार : आनंद महिंद्रा

…मी जल्लादची नोकरी स्वीकारण्यास तयार : आनंद महिंद्रा 

ऑनलाईन टीम / मुंबई :
उत्तर प्रदेशमधील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिह्यातील बलत्काराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत.

याबाबत आता महिंद्रा गुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही आवाज उठवला आहे. कठुआ बलात्काराच्या घटनेने संतापलेल्या महिंद्रा यांनी आपला राग ट्विटरवर व्यक्त केला आहे. बलात्काऱयांना फाशी देण्यासाठी मी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी सांगितले आहे.

तसेच “जल्लादची नोकरी कोणालाही हवी हवीशी वाटत नाही. मात्र जर बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱयांना शिक्षा द्यायची असेल, तर मी ही नोकरी आनंदाने स्वीकारेन. मी शांत राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र आपल्या देशातील अशा घटनांमळे माझं रक्त खवळतं.’’असा संताप महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

 

Related posts: