|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » Top News » मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणः स्वामीअसीमानंदसह पाच अरोपींची निर्दोष मुक्तता

मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणः स्वामीअसीमानंदसह पाच अरोपींची निर्दोष मुक्तता 

ऑनलाईन टीम / हैदराबाद :

हैदराबादमधील ऐतिहासिक मक्का मशिदीतील बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने अखेर 11 वर्षांनंतर निकाल दिला आहे. सबळ पुराव्या अभावी न्यायलयाने स्वमी असीमानंदसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

हैदराबादमधील मक्का मशिदीत 18 मे 2007 रोजी नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. तर 58 जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आंदोलन करणाऱया जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी 5 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण 160 साक्षीदार होते.

 

हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये 10 आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत. स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मणदास महाराज, मोहनलाल रतेश्वर व राजेंद्र चौधरी अन्य चार जण या प्रकरणात आरोपी होते. आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत. तर सुनील जोशींचा गोळीबारात मृत्यू झाला होता.

 

Related posts: