|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » भाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे : कमलनाथ

भाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे : कमलनाथ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उन्नाव आणि कठुआ येथील बलात्कारच्या प्रकरणांवरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये संशयीत आरोपी हे भाजपाशी संबंधीत नेते असल्याने भाजपावर सर्व स्तरातून टीका होत आहे.त्यातच काँग्रेस नेते कमलनाथ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बलात्कारी नेत्यांमुळे भाजपाचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे, अशा शब्दांत त्यांनी कठोर टीका केली आहे.

“मी कुठेतरी वाचले होते की, भाजापचे असे 20 नेते आहेत, ज्यांची नावे बलात्कारासंबंधी गुह्यांशी जोडलेली आहेत. त्यामुळे आता या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी असावे की, बलात्कार जनता पार्टी असायला हवे याचा विचार जनतेनेच करावा. असे वक्तव्य कमलनाथ यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप होण्याची शक्मयता आहे.