|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » साखर उद्यागोवार पुढील वर्षी मोठे संकट : शरद पवार

साखर उद्यागोवार पुढील वर्षी मोठे संकट : शरद पवार 

ऑनलाईन टीम / बारामती :

साखर उद्यागोवार पुढील वर्षी मोठे संकट उभे राहणार आहे. प्रचंड ऊस उत्पादन झाले आहे. मात्र जागतिक बाजारपेठेच मंदावली आहे. त्यामुळे पुढील वर्षी साखरेला 2500 रूपयांपर्यंतच दर मिळणार असल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे.

बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱया आप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचे वितरण आज शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पावर यांनी साखर उद्योगासाठी पुढील वर्षे संकटाचे असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे पुढील वर्षी केंद्र सरकारने ठरवून दिलेला ऊसाचा दर देणेही कारखान्यांना शक्य होणार नसल्याचेही पवारांनी म्हटले आहे. दुसरीकडे शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्याकडे राजकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.

 

Related posts: