|Sunday, July 22, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » रिलायन्सची JioHomeTV सेवा, 400 रुपयांपासून प्लॅन

रिलायन्सची JioHomeTV सेवा, 400 रुपयांपासून प्लॅन 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

दूरसंचार क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर रिलायन्स जिओ आता ब्रॉडबँड सर्व्हिस आणि डायरेक्ट टू होम सेवेवर काम करत आहे. याबाबत अनेक वृत्तही समोर आले आहेत. अशातच जिओ आता JioHomeTV ही नवी सेवा लाँच करणार असल्याचं वृत्त आहे.

TelecomTalk च्या वृत्तानुसार JioHomeTV मध्ये ग्राहकांना 200 एसडी (स्टँडर्ड डेफिनेशन) आणि एचडी (हाय डेफिनेशन) चॅनल मिळतील, ज्याची किंमत 400 रुपयांपासून सुरु होणार आहे.

दरम्यान, JioHomeTV ही सेवा कंपनीची डीटीएच सेवा असेल की नवी सेवा आहे, हे कंपनीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. शिवाय रिलायन्सने याबाबत अजून औपचारिक घोषणा केलेली नाही.

Related posts: