|Monday, October 15, 2018
You are here: Home » विशेष वृत्त » मुंबई- कोल्हापूर उद्यापासून ‘हवाहवाई’

मुंबई- कोल्हापूर उद्यापासून ‘हवाहवाई’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई ते कोल्हापूर विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबई- कोल्हापूर आणि कोल्हापूर- मुंबई या विमानसेवेतून 30 प्रवासी उद्या उडान येजनेअंतर्गत प्रवास करणार आहेत.

गेल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या या विमानसेवेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या पाठपुरव्यानंतर पुन्हा कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू होत आहे.मुंबईतून उद्या दुपारी दोन वाजता विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर या विमानातून कोल्हापूरला येतील.तर कोल्हापूरहून मुंबईला शेतकरी, अनाथ आणि अपंग मुले वेचक महिला,तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱया महिला प्रवास करतील. कोल्हापूरची विमानसेवा अखंडित रहावी यासाठी धनंजय महाडिक यांनी पुढील सहा महिन्यांची विमान तिकिटे घेण्याची तयारी दाखवली आहे.

 

Related posts: