|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » उद्योग » बाजारमूल्यात कोटक बँक दुसऱया स्थानी

बाजारमूल्यात कोटक बँक दुसऱया स्थानी 

मुंबई :

सोमवारी कोटक महिंदा बँकेच्या समभागात तेजी आल्याने बाजारमूल्याच्या बाबत एसबीआयला पहिल्यांदाच मागे टाकले. बीएसईवरील आकडेवारीने, कोटक महिंद्रा बँकेचे बाजारमूल्य 2,22,560 कोटी रुपयांवर पोहोचले असून एसबीआयचे बाजारमूल्य 2,22,042 कोटी रुपये आहे. एचडीएफसी बँक देशातील सर्वात मूल्यवान बँक ठरली असून तिचे बाजारमूल्य 5.04 लाख कोटी रुपये आहे.

उदय कोटक यांच्या नेतृत्वाखालील बँकेच्या व्यवसायात सलग तेजी दिसून येत आहे. अनुत्पादित कर्जाचा रेशो एक टक्के असून तो स्थिर आहे. नॉन बँकिंग क्षेत्रात वाढ कायम राहणार असून भविष्यात तेजी राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांकडून  वर्तविण्यात आली. आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत बँकेने चांगली कामगिरी केली असून उच्च शुल्क उत्पन्न, सर्वोत्तम संपत्ती गुणवत्ता व्यवस्थापन आणि व्यवस्थापनाकडून आर्थिक क्षेत्रात निर्णय यामुळे आपली क्षमता सिद्ध केली आहे.

Related posts: