|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोलीत टस्करांनी केले शेतीचे नुकसान

आंबोलीत टस्करांनी केले शेतीचे नुकसान 

वार्ताहर / आंबोली:

आंबोली-नांगरतासवाडी, गडदूवाडी परिसरात दोन टस्करांनी धुमाकूळ घातला असून येथील शेतकऱयांचे मोठे नुकसान केले आहे. गेले आठ दिवस हे दोन हत्ती शेतकऱयांच्या निदर्शनास पडत असून ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. नांगरतास-गडदूवाडी येथील सुनील नार्वेकर, विद्यासागर गावडे, विनायक गावडे,
प्रकाश गावडे, दीपक मेस्त्राr आदी शेतकऱयांचे हत्तींनी नुकसान केले. वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.