|Monday, November 19, 2018
You are here: Home » उद्योग » सहा राज्यांत लागू होणार इन्ट्रा स्टेट ई वे बिल

सहा राज्यांत लागू होणार इन्ट्रा स्टेट ई वे बिल 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील माल वाहतूक प्रणाली सुरळीत करण्यासाठी अन्य सहा राज्यांत इन्ट्रा स्टेट ई वे बिल लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेने हा निर्णय घेतला असून 20 एप्रिलपासून लागू होईल. 15 एप्रिलपासून आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश या राज्यांत इन्ट्रा स्टेट ई वे बिल लागू करण्यात आले आहे. देश पातळीवर ई वे बिल लागू करण्यात आल्यानंतर राज्य पातळीवर विस्तारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

देशात ई वे बिल लागू करण्यात आल्याने माल वाहतुकीमध्ये 30 टक्क्यांनी वेळेची बचत झाली. सोमवारी देशात 10.31 लाख ई वे बिल जारी करण्यात आले होते. जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यावर परिषदेत चर्चा करण्यात आली. रिटर्न फायलिंग सुलभ करण्याचे काम सुरू असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर नवीन प्रारुप लागू करण्यात येईल असे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी सांगितले. या परिषदेत 15 अप्रत्यक्ष कर तज्ञ आणि उद्योग क्षेत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जीएसटी बैठकीत अन्य निर्णय घेण्यात आले. यामध्ये ई वे बिलचा एसएमएस अथवा प्रिन्ट आऊट असल्यास तेही स्वीकारण्यात येईल. ई वे बिलची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात येईल. राज्यांतर्गत 50 हजारपेक्षा जास्त रुपयांचा माल नेण्यात आल्यास इन्ट्रा स्टेट ई वे बिलची आवश्यकता भासणार असून सध्या देश पातळीवर ही प्रणाली सुरू आहे. गुजरातमधून सर्वाधिक ई वे बिल जनरेट करण्यात आले असून यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

Related posts: