|Saturday, August 24, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारमूल्यात महिंद्राने टाटाला टाकले मागे

बाजारमूल्यात महिंद्राने टाटाला टाकले मागे 

वृत्तसंस्था/ मुंबई

चालू वर्षात सरासरी मान्सून होणार असल्याचे भाकित वर्तविण्यात आल्याने महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपन्यांच्या समभागात सकाळच्या सत्रात तेजी आली. कंपनीकडून टॅक्टरची निर्मिती करण्यात येत असल्याने यंदा अधिक विक्री वाढण्याची शक्यता असल्याने समभाग वधारल्याने कंपनीचे बाजारमूल्य 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचणार. कंपनीचा समभाग सार्वकालीन उच्चांकावर पोहोचला असून बाजारमूल्यात टाटा मोटर्सला मागे टाकले. यामुळे महिंद्रा समूह देशातील दुसऱया क्रमांकाचा वाहन उत्पादक बनला आहे. सध्या या क्षेत्रात पहिल्या स्थानी मारुती सुझुकी आहे. एक लाख कोटी रुपयांच्या क्लबमध्ये इन्डसइंड बँक, बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स यांचा काही महिन्यांपूर्वीच समावेश झाला.

टाटा मोटर्सची उपकंपनी असणाऱया जग्वार लँड रोव्हरकडून इंग्लडमध्ये कर्मचारी कपात करण्यात येणार असल्याने गेल्या दोन सत्रात कंपनीचा समभाग घसरला. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य घटले. बीएसईवर टाटा मोटर्सचे बाजारमूल्य 97,274 कोटी रुपयांवर घसरले आहे. महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे मंगळवारी सत्राअखेरीस बाजारमूल्य 1,00,648 कोटी रुपयांवर पोहोचले. ही कंपनी आता बाजारमूल्याबाबतीत अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्पोरेशन आणि इन्डसइंड बँक यांच्या गटात सहभागी झाली.