|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तोगडियांचे उपोषणास्त्र

तोगडियांचे उपोषणास्त्र 

राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी उपोषण सुरू

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुजरातमधील पदाधिकारींनी उपोषण संपुष्टात आणण्यासाठी तोगडियांची भेट घेतली, परंतु तोगडिया उपोषणावर ठाम राहिले आहेत. देशात महिला असुरक्षित असून त्यांच्यावर अत्याचार होत असताना पंतप्रधान आणखी एका विदेश दौऱयावर रवाना झाले आहेत, अशी टीका तोगडियांनी केली आहे. 

14 एप्रिल रोजी झालेल्या विहिंपच्या संघटनात्मक निवडणुकीत पराभवानंतर नव्या नेतृत्वासोबत आपले मतभेद नाहीत. विद्यमान नेतृत्वाने राम मंदिर उभारणीच्या मागणीसमवेत हिंदुत्वाच्या मुद्यांवर आपल्यासोबत यावे, अन्यथा नवी दिल्लीत उपोषण करावे, असे तोगडिया यांनी म्हटले. विहिंपचे मंत्री आणि हरियाणातील संघाचे माजी प्रांत प्रचारक महावीर यांनी संघटनेचा राजीनामा दिल्याचा दावा तोगडियांनी केला.

राम मंदिरासाठी कायदा व्हावा

केंद्रात सत्तेवर आल्यास अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी कायदा आणू असे आश्वासन आम्ही जनतेला दिले होते. समान नागरिक कायदा आणि कलम 370 हटविण्याची आश्वासने दिली होती. याच मुद्यांवरून संघाच्या जुन्या निर्देशांनुसार मागण्यांवर ठाम असल्याचा दावा तोगडियांनी केला.