|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » ईपीएफओ सदस्यांना नियंत्रित करता येणार गुंतवणूक

ईपीएफओ सदस्यांना नियंत्रित करता येणार गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षापासून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना आपल्या खात्यातील गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)मधील आपली गुंतवणूक वाढ अथवा घटविता येणार आहे.

ईपीएफओकडून सदस्यांच्या पीएफ खात्यांमधून तीन महिन्यांसाठी ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. या तीन महिन्यानंतर सदस्यांनी आपली गुंतवणूक वाढविण्याचा अथवा घटविण्याचा अधिकार राहील. पीएफ खात्यामधून ईटीएफमध्ये किती गुंतवणूक करण्यात आली याची माहिती सदस्यांना देण्यात येणार असून ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल असे ईपीएफओचे केंद्रीय आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले. सेन्ट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी या ईपीएफओच्या संघटनेने इक्विटीमधील गुंतवणूक सध्याच्या 15 टक्क्यांच्या मर्यादेनंतर वाढविण्याचा निर्णय सदस्यांना घेण्याची परवानगी दिली. ऑगस्ट 2015 पासून ईपीएफओ ईपीएफमध्ये गुंतवणूक करत आहे.