|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयातील नक्षलवाद्यांशी संबंधित पोलिसांच्या हिटलिस्टवर?

साताऱयातील नक्षलवाद्यांशी संबंधित पोलिसांच्या हिटलिस्टवर? 

साताऱयातील नक्षलवाद्यांशी संबंधित पोलिसांच्या हिटलिस्टवर?

प्रतिनिधी/ सातारा

राज्यात अलिकडच्या काही घटनांवरुन गृहविभागाने घेतलेल्या निर्णयानुसार काल नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्यां संघटनांच्या कार्यालयावर छापे घातले. त्यानंतर सातारा पोलिसांनीही पुण्यातील एल्गार परिषदेच्या अनुषंगाने काही संघटनांचा हात असल्याच्या संशयावरुन सातारा पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत. गोपनिय पद्धतीने सातारा पोलिसांची चौकशी सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यामुळे अनेकांचे धाबेही दणाणले असून काही जणांनी साधव भूमिका घेतल्याचे समजते.

सातारा शहरासह जिल्हा हा शांत म्हणून ओळखला जातो. या जिह्यात अनेक गुन्हेगारही बाहेरील वातावरण शांत होईपर्यंत मुक्काम करतात. अन् पुन्हा परत फिरतात. असे समिकरण पूर्वीपासूनच चालत आहेत. पुणे येथील एल्गार परिषदेत जी भडकावू भाषणे झाली. त्यानंतर कोरेगाव-भीमा प्रकरण घडले होते. हाच धागा पकडत राज्यात राज्याच्या गृहविभागाने नक्षलवाद्यांशी ज्या संघटनांचे संबंध आहेत. त्या संघटनांच्या कार्यालयावर छापेमारी सुरु केली. पुणे येथील कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याचे वृत्त सातारा जिह्यातही समजताच जिह्यामध्येही अनेकांची नाळ अशा संघटनांशी जोडली गेली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतली आहे. दरम्यान, सातारा पोलिसांकडूनही अशा संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते हे हिटलिस्टवर असून तशी  सातारा पोलिसांची गोपनिय पद्धतीने चौकशी सुरु आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. तसेच काही कार्यकर्तेही यापूर्वी कबीर कलामंचमध्ये सक्रीय होते. त्यांनी साताऱयात मुक्काम वाढवला आहे. त्यांना साताऱयातील काहींनी आधार दिल्याची चर्चाही रंगू लागली आहे. तसेच यापूर्वीच नक्षली व अतिरेक्यांशी जवळीक असलेल्या व्यक्तींच्याबाबत काही घटना उघडकीस आल्या होत्या. त्यावरुन सातारा पोलिसांकडून गोपनिय पद्धतीने चौकशी सुरु केल्याची चर्चा सुरु आहे.