|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जातीव्यवस्था नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न महात्मा बसवेश्वर यांनी केला

जातीव्यवस्था नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न महात्मा बसवेश्वर यांनी केला 

कोल्हापूर :

बाराव्या शतकात जातीव्यवस्था नष्ट करण्याचा पहिला प्रयत्न महात्मा बसवेश्वर यांनी केला. असे प्रतिपादन आजरा महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवशंकर उपासे यांनी केले. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये बसवेश्वर अध्यासन सुरू करण्याची मागणी  केली.

शिव-बसव जयंतीनिमित, ‘महात्मा बसवेश्वर जीवन व काय्xा’ या विषयावर आयोजित व्य़ाख्यानामध्ये ते बोलत होते. कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने दसरा चौक येथील चित्रदुर्ग मठात हा कार्यकम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून,आमदार राजेश क्षीरसागर हे होते. यावेळी चित्रदुर्ग मठाचे बसव मल्लीकार्जुन स्वामीजी उपस्थित होते.

आपल्या व्याख्यानात ,प्रा. उपासे म्हणाले, माणसामाणसामध्ये एकता-समानता असावी हा विचार महात्मा बसवेश्वर यांनी मांडला आहे. त्यांनी स्त्री-पुरूष हा भेदभाव कधीच केला नाही. महीलांना कधीच कमी लेखू नये त्यांना पुरूषाबरोबर सर्व हक्क मिळावेत असा त्यांचा प्रयत्न होता. आंतरजातीय विवाह लावण्यामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा मोठा वाटा असल्याचे उपासे यांनी सांगून श्रमा मुळेच माणसामध्ये प्रतिष्ठा निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रुमुख पाहुणे म्हणून आमदार राजेश क्षीरसागर यांनी लिंगायत समाजाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करून, समाजाच्या रूद्रभूमीसाटी 20 लाख रूपये निधी जाहीर करत आहे. तसेच विशेष निधीमधून 50 लाख रूपयाची तरतूद करण्यासाटी वचनबध्द असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, सुहास भेंडे,श्रीकांत बनछोडे यांची भाषणे झाली. स्वागत सुनिल गाताडे, प्रास्ताविक सुहास भेंडे, आभार चंद्रकांत स्वामी, सूत्रसाचालन वारणा वडगांवक व,राजू वाली यांनी केले.

कार्यक्रमास नानासाहेब नष्टे, राजेंश पाटील-चंदुरकर, शंकरराव कदम, वसंतराव सांगवडेकर, ऍड सतीश खोतलांडे, वैभव सावर्डेकर, डॉ. गिरीश कोरे, संदीप नष्टे, राहुल नष्टे, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते

Related posts: