|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पाण्यासाठी महिलांनी केला रस्ता रोको

पाण्यासाठी महिलांनी केला रस्ता रोको 

प्रतिनिधी /सातारा :

मंगळवारी तब्बल साडेचार तास विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गुरुवारीही अशीच टंचाई पालिकेच्या मुख्य इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या घरांमध्ये झाला असल्याने नागरिकांनी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती पालिका प्रशासनाला मिळताच त्यांनी  तेथे जावून त्यांनी नागरिकांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱया शहापूर उपसा योजनेचा मंगळवारी विद्युत पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे शहराच्या काही भागात पाणी टंचाई निर्माण झाली. गुरुवारीही तशीच पाणी टंचाई जाणवली. चक्क केसरकर पेठेतच पाणी टंचाई झाल्याने संतप्त नागरिकांनी तालिम संघाच्या जवळ सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूकीची कोंडी झाली होती. पालिकेच्या पदाधिकाऱयांना याची माहिती मिळताच पाणी पुरवठय़ाचे अधिकारी संदीप सावंत यांनी तेथे भेट देवून नागरिकांना आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, पहिलाच पाण्यासाठी यावर्षी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याचे बोलले जात आहे.