|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » बलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन : हायकोर्ट

बलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन : हायकोर्ट 

ऑनलाईन टीम / मुंबई :
बलात्कार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,अशी खंत मुंबईत हायकोर्टाने गुरूवारी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी त्यांच्या मारेकऱयांचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणेच्या तपासावरही हायकोर्टाने तोशेरे ओढले आहेत.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी झाली. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हायकोर्टाने या प्रकरणावर खंत व्यक्त केली. विचारवंत वा उदारमतवाद्यांवरील हल्ले यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत आहे. सर्जनशील तसेच खुले विचार मांडणाऱयांना भारतात स्थान नाही. येथे ते सुरक्षित नाहीत, किंबहुना भारत म्हणजे केवळ बलात्कार आणि गुन्हे असा समज जगभरात पसरत आहे, असे हायकोर्टाने सांगितले.

 

Related posts: