|Thursday, September 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » श्रमाला प्रति ष्ठा देणारे संतश्रे ष्ठा बुरूड केतेश्वर महाराज

श्रमाला प्रति ष्ठा देणारे संतश्रे ष्ठा बुरूड केतेश्वर महाराज 

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांच्याकडून दीक्षा घेतलेले त्यांचे सर्वप्रिय व सर्वश्रे÷ शिष्य तसेच अनुसूचित जातीतील बुरुड समाजाचे आद्य धर्मगुरु शिवभक्त बुरुड (मेदार) केतय्या महास्वामीजी यांना बुरुड समाजाचे लोक केतेश्वर म्हणूनच वंदन करतात. त्यांनी आयुष्यभर सामाजिक समरसतेला महत्त्व देऊन श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यानिमित्त केतय्या महास्वामीजींच्या कार्यावर टाकलेला एक प्रकाशझोत. बारावे शतक हे कर्नाटकाच्या इतिहासातील सुवर्णयुग मानले जाते. म. बसवेश्वर यांच्यासह अनेक समकालीन संत महापुरुष याच शतकात झाले. 12 व्या शतकात वर्णाश्रम पद्धती अत्यंत कडक होती. बसवेश्वरांनी शुद्र वर्गाला वर आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनुभव मंटपाची स्थापना करून उपेक्षित समाजाला खुले व्यासपीठ उपलब्ध केले. सुमारे साडे आठशे वर्षापूर्वी 770 सदस्य असलेले अनुभव मंटप हे जगातील पहिले संसद मानले जाते. ज्यात अष्टपैलू हिऱयाप्रमाणे चमकणाऱया केतय्या यांना मानाचे स्थान होते. कारण ते सर्वश्रे÷ शिवभक्त होते. कायकवे कैलास म्हणजे काम (कष्ट) हाच स्वर्ग अशी केतय्यांची धारणा होती. ते त्यांनी आयुष्यभर अंगीकारले. समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी त्याकाळी झालेल्या सामूहिक प्रयत्नात अग्रेसर राहिलेले शिवभक्त  केतय्या बाराव्या शतकातील ते एक थोर संत होऊन गेले. बांबूच्या काडय़ापासून दुरुडी, टोपल्या, सूप, पाळणे इत्यादी गृहापयोगी वस्तू तयार करण्याचा त्याचा मूळ व्यवसाय होता. संत केतय्या हे श्रमजीवी तर होतेच, शिवाय ते एक श्रे÷ वचनकारही होते. मानवी जीवनाला मार्गदर्शक ठरावीत अशी अनेक वचने त्यांनी लिहिली. त्यांचा कार्यकाळ इ. स. 1160 चा सांगितला जातो. सत्य, शुद्धता आणि अर्थप्राप्ती तत्कालीन संतांनी आपल्या व्यवसायालाच देव मानण्याचा मार्ग अवलंबला. त्यानुसार केतय्या यांनी याच तत्त्वावर आधारित बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे कार्य करत समाजाला गृहोपयोगी वस्तू पुरवण्याची सेवा केली. प्रत्यक्ष देवतांनीही केतय्यांची परीक्षा घेतली. जंगलात जाऊन लाकूड तोडणे आणि असलेल्या उत्पन्नातून दासोह (अन्नछत्र) चालवणे हेच त्यांचे नित्य कर्म होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची, स्वतःच्या पोटाची आबाळ असतानाही केतय्या आणि त्यांच्या पत्नी सातव्वाने कधीच आपल्या सेवाकार्यात खंड पडू दिला नाही. आपली नि÷ा सिद्ध करण्यासाठी केतय्यांना सत्त्वपरीक्षा द्यावी लागली. आपले नित्यकर्म हेच प्रथम कर्तव्य समजून निःस्वार्थ व समर्पण भावनेने कर्म करणाऱया केतय्यांनी आपल्या कार्यालाच ईश्वर मानले. गवरेश्वर या अंकित नामाने केतय्यांनी लिहिलेली 18 वचने कन्नड साहित्यात उपलब्ध आहेत. प्रत्येक संतानी गुरुला, देवाला आणि आराध्य देवताना वचनात स्थान दिले. मात्र केतय्यांनी आपल्या कर्तव्यालाच देव मानून क्रांतिकारी दिशा दाखवली. म्हणून केतय्यांचे गवरेश्वर हे वचनांकित स्वतःचे वेगळेपण सिद्ध करते. केतय्यांनी जी काही मोजकी वचने लिहिली त्यातून लोकजागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी आपल्या आचरणातून समाजाला संदेश दिला. त्यांची वचने अत्यंत प्रभावी होती. लोकांना समजतील अशा साध्या सरळ शब्दात त्यांनी वचनाची रचना केली. त्यांच्या वचनामध्ये नित्य जीवनात येणाऱया लोकानुभवाचा प्रत्यय येतो. प्रापंचिक सुखात त्यांचे मन कधीच रमले नाही. समाजसुधारणेचा ध्यास घेऊन सतत लोककल्याणासाठी ते झटले. आपले नित्यकर्म करत दासोह सेवा अविरतपणे चालविली. त्यात कधीही खंड पडू दिला नाही. तत्कालीन समाजव्यवस्थेने वचनसाहित्याला लोकमान्यता दिली, हा धागा पकडून केतय्यांनी एकाहून एक अर्थपूर्ण वचने लिहिली. त्या वचनात स्वतःच्या नावाचा कुठेही उल्लेख न आणता जनहिताचा सर्वार्थाने विचार मांडण्यात आला होता. समाजात प्रचलित असलेल्या अनि÷ चालीरीती, अंधश्रद्धा यावर मार्मिक शब्दात प्रहार केले.

बुरुड केतय्या यांनी नित्य जीवनात शुद्ध आचार-विचाराने देवत्व प्राप्त केले. कर्नाटकातील सहय़ाद्री पर्वतश्रेणी उतरून खाली आल्यावर तेथे बेलूर नावाचे छोटे गाव आहे. सध्या हे गाव धारवाड जिल्हय़ातील बैलहोंगल तालुक्मयात आहे. उवळी ते कित्तूर जवळच्या बेलूरच्या धनदाट जंगलात झाडे तोडून त्यापासून गृहोपयोगी वस्तू तयार करणारी ही एक ऐतिहासिक व्यक्ती होय. त्यांना केतीदेवी, केतय्या, क्मयातय्या, केत नंदे, केतीदेवय्या, केतेश्वर अशा विविध नावांनी ओळखले जायचे. बुरुड केतय्यांनी सूप, टोपल्या, दुरुडी, फुलासाठी कटोरी वगैरे वस्तू बनवण्याचा व्यवसाय निवडला. संसारी माणसाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अर्धांगिनीची साथ महत्त्वाची ठरते असा आजपर्यंतचा इतिहास आहे. सातव्या यांच्यासारखी आदर्श विचारसरणीची व पतीच्या प्रत्येक कार्यास हवे तसे सहकार्य करणारी पत्नी मिळाली म्हणूनच केतय्यांच्या हातून समाजसेवा घडली. सुख दु:खात तिने नेहमीच मदत केली. तसे सुख त्यांच्या वाटय़ाला लौकिकार्थाने कधी आलेच नाही. नित्य दासोह सेवेतून पतीला लाभलेले मानसिक समाधान हेच सातव्याने परमसुख मानले. परमार्थिक सुखात तिने आनंद मानला. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी सामाजिक क्रांतीला प्रारंभ केला. त्यापासून प्रेरणा घेऊन बुरुड केतय्या कल्याणला जंगलात छातीत बांबूचा तुकडा घुसल्यावरही घरी जाऊन त्यांनी आपल्या पत्नीकडून दासोह पूर्ण करून घेतला.

मनुष्याचे जीवन शाश्वत नसून त्याने आपल्या जीवनात आत्मसात केलेले आदर्श शाश्वत आहेत. त्या आदर्श तत्त्वामध्ये माणुसकी व तात्विक चिंतन सामावलेले आहे असे बुरुड केतय्या यांचे मत होते. आपल्या नित्य कार्यातून त्यांनी समाजाला मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. माणसाने चारित्र्यवान व्हावे यासाठी केतय्यांनी व्यापक प्रमाणात लोकजागृती केली. आपल्या शुद्ध चारित्र्याने व आदर्श नीतिमूल्यांनी त्यांनी समाजाला सुज्ञ बनवण्याचा प्रयत्न केला. बुरुड व्यवसायात पाळणे बनवण्याला मोठे महत्त्व आहे. बाळ शांतपणे झोपण्यासाठी पाळणा आवश्यक असतो. या पाळण्याची उपमा बुरुड केतय्यांनी मानवी जीवनातल्या आदर्श विचारांना दिली आहे. मानवी मनाला त्यांनी बाळ मानले आहे. वेगवेगळय़ा कारणाने कलुषित झालेल्या मनाला सदाचाराच्या पाळण्यात घालून सद्गुणांचे झोके द्यावेत असे केतय्या म्हणतात. माणूस म्हणून जगायचे असेल तर षड्विकारांवर मात करून चारित्र्य जोपासा, चारित्र्यवान माणूसच सुखी जीवन जगतो असा उपदेश त्यांनी केला. आयुष्यभर त्यांनी आपल्या विचाराप्रमाणे आचरण केले. म्हणूनच लोकांनी त्यांना ‘चारित्र्य चक्रवर्ती’ ही उपाधी बहाल केली.

 कन्नड साहित्यांमध्ये त्यांच्या जीवन चरित्रावर बराच प्रकाश टाकण्यात आला. साहित्य आणि मानवी साधने ही माध्यमे बुद्धिमान माणसाला महान बनवतात, त्याचप्रमाणे मुळात सदाचारी चारित्र्यवान असलेल्या केतय्यांना कन्नड लोकसाहित्याने अधिक समृद्ध केले आहे. श्रमजीवी असलेले केतय्या बुद्धीजीवी बनले व एक थोर तत्वचिंतक म्हणून पुढे आले. त्यांनी सांगितलेला जीवनावश्यक दृष्टिकोन हा मानवी जीवनाची आदर्श आचारसंहिता ठरते.

दशरथ वडतिले, सोलापूर

Related posts: