|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला

विर्डी प्रकल्पग्रस्तांचा वनवास संपला 

27 जणांना भूखंडांचे वितरण : आता सुविधांची प्रतीक्षा

प्रतिनिधी / दोडामार्ग:

तालुक्यातील विर्डी येथे साकारत असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पासाठी पुनर्वसन करण्यात आलेलेप्रकल्पग्रामगेली 14 वर्षे भूखंडांच्या प्रतीक्षेत होते. आता प्रकल्पग्रस्तांना सोडत पद्धतीने भूखंडांचे वितरण शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार रोहिणी रजपूत यांच्या हस्ते झाले. एकूण 33 प्रकल्पग्रस्तांपैकी 27 जणांना भूखंड वितरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार रजपूत यांच्यासमवेत सरपंच सौ. गवस, संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. गेल्या आठवडय़ात तहसीलदार रजपूत यांनी विर्डी प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक घेऊन पंधरा दिवसात भूखंड वितरित करण्याची ग्वाही दिली होती. शिवाय विद्यमान तहसीलदार रजपूत पूर्वी पुनर्वसन तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांना पुनर्वसितांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे भूखंड देण्यासाठी रजपूत यांनीही आग्रही भूमिका घेतली. सध्या विर्डीतील प्रकल्पग्रस्त गावठाणात ज्या अपुऱया नागरी सुविधा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.

शुक्रवारी सोडत पद्धतीने भूखंडाचे वितरण झाले. 33 जणांना भूखंड मिळणार होते. त्यापैकी 27 प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. त्यांना भूखंड वितरण करण्यात आले. आपण भूखंड वितरणाचा शब्द दिला होता. तो पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे रजपूत यांनी सांगितले. सहाजण अनुपस्थित असल्याने त्यांना नंतर भूखंड वितरण करण्यात येणार आहे.

आता नागरी सुविधा व्हाव्यात!

भूखंड वितरण झाल्यावर तेथे घरबांधणी होऊन गावठण होणार आहे. त्या ठिकाणी 18 नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने गतिमान पावले उचलावीत, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांमधून होत आहे.

Related posts: