|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » उद्योग » देशातील 19 कोटी लोक बँक खात्याविना

देशातील 19 कोटी लोक बँक खात्याविना 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मोदी सरकारची जन धन योजना  यशस्वी झाली, तरी अद्याप देशातील 19 कोटी नागरिकांजवळ अजूनही कोणतेही बँक खाते नाही. चीननंतर ही सर्वात मोठी लोकसंख्या आहे, असे जागतिक बँकेने म्हटले.

जागतिक बँकेने आपल्या अहवालात सरकारच्या जन धन योजनेची प्रशंसा केली आहे. गेल्या काही वर्षात देशातील निम्मी बँक खाती निष्क्रीय असल्याचे सांगण्यात आले आहे. मार्च 2018 पर्यंत जनधन योजनेंतर्गत 31 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. 2011 पासून बँक खाती असणाऱया नागरिकांच्या संख्येत दुप्पट वाढ होत 80 टक्क्यांवर पोहोचली आहे. जागतिक पातळीवर बँक खाती नसलेल्यांमध्ये भारताचा हिस्सा 11 टक्के आहे. जगातील 3.8 अब्ज लोकांचे बँक खाते आहे. 2011 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर 51 टक्के असणारे प्रमाण आता 62 टक्क्यांवर पोहोचले. जागतिक पातळीवर अजूनही 1.7 कोटी लोकांकडे बँक खाते नसून मोबाईलच्या वापराने ते आर्थिक सेवांचा लाभ घेऊ शकतात असे म्हणण्यात आले.

चीनमध्ये सर्वाधिक 22.5 कोटी लोकांचे बँक खाती नाही. भारतानंतर 10 कोटीसह पाकिस्तान आणि इंडोनेशियात 9.5 कोटी लोकांकडे खाते नाही. जनधन योजनेतून सुरू करण्यात आलेल्या खात्यांपैकी निम्मी निष्क्रिय असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. 2014 ते 2017 या कालावधीत बँक खाती उघडण्याचे प्रमाण 30 टक्के, तर महिलांमध्ये 40 टक्क्यांनी वाढले.

Related posts: