|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अंगणवाडी कर्मचाऱयांनी एकजूट कायम राखावी

अंगणवाडी कर्मचाऱयांनी एकजूट कायम राखावी 

कमलताई परुळेकर यांचे आवाहन

प्रतिनिधी / सावंतवाडी:

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या एकजुटीमुळे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. आता अंगणवाडी कर्मचाऱयांच्या समस्या उरल्या नसल्या तरी त्यांनी अशीच एकजूट कायम ठेवावी. तसेच डीएड, बीएडधारक युवकांची संख्या पाहता अंगणवाडी कर्मचाऱयांनी आता आपली नोकरी प्रामाणिकपणे केली पाहिजे, असे प्रतिपादन कमलताई परुळेकर यांनी येथे केले.

येथील श्रीराम वाचन मंदिरात अंगणवाडी कर्मचाऱयांचा मेळावा झाला. यावेळी कमलताई परुळेकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱयांचे वय शासनाने 65 वरून 60 केले होते. अंगणवाडी कर्मचाऱयांच्या पगारवाढीची मागणी होती. यासंदर्भात कृती समितीने आंदोलन केले. विरोधी पक्षांनीही साथ दिली. अंगणवाडी कर्मचाऱयांनी संघटितपणे लढा दिला. त्यामुळे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱयांचे वय पूर्ववत 65 केले. तसेच अंगणवाडी कर्मचाऱयांचा पगारही वाढविला. मात्र, आंदोलनाच्या काळात शासनानेमेस्माकायदा लावला. हा कायदा अन्यायकारक असल्याने या संदर्भातही लढा द्यावा लागला. शिवसेनेही हा कायदा मागे घेण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने साथ दिल्याने हा कायदाही मागे घेण्यात आला, असे सांगितले.

अन् मुंडे रुसून बसल्या!

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या लढय़ाच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भूमिका आडमुठेपणाची होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मार्ग काढत मागण्यांबाबत विधानसभेतही घोषणा केली. त्यावेळी पंकजा मुंडे रुसून बसल्या होत्या, असेही परुळेकर म्हणाल्या.

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱयांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे केली पाहिजे. आज डी. एड., बी. एड. झालेल्या युवकांना नोकऱया मिळत नाहीत. ही परिस्थिती पाहता अंगणवाडी कर्मचाऱयांनी आपली नोकरी प्रामाणिकपणे करून मुलांना घडविले पाहिजे, असेही परुळेकर म्हणल्या. त्यांनी कर्मचाऱयांना विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी सूर्यकांत सावंत पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts: