|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » व्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन

व्होल्वोकडून आणखी दोन मॉडेलचे देशात उत्पादन 

वृत्तसंस्था/ चेन्नई

व्होल्वो या स्वीडिश कार कंपनीने एक्ससी 60 आणि व्ही 90 क्रॉस कन्ट्री या दोन मॉडेलचे देशात उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. देशातल आपला प्रिमियम कार क्षेत्रातील हिस्सा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बेंगळूरमधील प्रकल्पातून एक्ससी 90 मॉडेलचे उत्पादन घेण्यात येणार आहे. सुटय़ा भागांचा पुरवठा तत्काळ होण्यासाठी गोदामामध्ये गुंतवणूक करण्यात येणार असून बेंगळूरच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल असे व्होल्वो कार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्लस फ्रम्प यांनी सांगितले.

कंपनीकडून प्रतिमहिन्यात एक वितरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. कंपनीकडून लहान एसयूव्हीची विक्री करण्यात येत नसून ती जागा भरून काढण्याचे काम एक्ससी 40 करेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. गेल्या वर्षात कंपनीने 2 हजार युनिट्सची विक्री केली असून 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली. 2020 पर्यंत लक्झरी कार क्षेत्रात 10 टक्के हिस्सा मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. सध्या तो 5 टक्के आहे.

 

Related posts: