|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क

लहान शहरांतील पीओएसमधून काढा 2000 रुपये विनाशुल्क 

वृत्तसंस्था/ मुंबई

लहान शहरांतील रिटेल आऊटलेटमधील पीओएस (पॉईन्ट ऑफ सेल)मधून 2000 रुपये काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही असे भारतीय स्टेट बँकेकडून सांगण्यात आले. आरबीआयच्या निर्देशानुसार, टिअर  1 आण 2 शहरांमध्ये प्रतिकार्ड एक हजार रुपये आणि लहान शहरांमध्ये 2 हजार रुपयांचे मर्यादा निश्चित करण्यात आली. देशातील 4.78 लाख पीओएसमधून या सेवेचा लाभ घेता येईल असे एसबीआयकडून सांगण्यात आले. एसबीआय अथवा अन्य बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करत प्रतिदिनी टिअर 3 ते 6 मध्ये 2 हजार रुपये आणि टिअर 1, 2 मध्ये 1 हजार रुपये कोणत्याही शुल्काशिवाय काढू शकतात. एसबीआयकडून 6.08 लाख पीओएस मशिन वितरित करण्यात आली असून यापैकी 4.78 लाखमधून रोकड काढण्याची सुविधा आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील एटीएममध्ये रोकडची कमतरता भासत असल्याने एसबीआयकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला.

Related posts: