|Friday, January 18, 2019
You are here: Home » उद्योग » स्वतंत्र मानांकन संस्थेसाठी भारताकडून बोलणी

स्वतंत्र मानांकन संस्थेसाठी भारताकडून बोलणी 

नवीन विकास बँकेचा होणार विस्तार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

भारताने पाच सदस्य देश असणाऱया ब्रिक्स संघटनेने स्वतंत्र मानांकन संस्था स्थापन करावी यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्रिक्समधील पाच देशांच्या अर्थ मंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांची बैठक घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या परिषदेदरम्यान स्वतंत्र्य संस्थेसाठी चर्चा करण्यात आली.

भारताने ब्रिक्स देशांकडून स्वतंत्र पतमानांकन संस्था उभारावी असा प्रस्ताव मांडला असून त्याला अन्य चार देशांनी पाठिंबा द्यावा असे सांगण्यात आल्याचे अर्थ सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सांगितले. ब्रिक्स या संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात एस ऍण्ड पी, मूडीज आणि फिच या संस्थांचे वर्चस्व असून त्या मनमानीप्रमाणे मानांकन करत असल्याचा आरोप भारत आणि चीनने केला आहे. मानांकन क्षेत्रात या तीन संस्थांचा हिस्सा 90 टक्के आहे.

नवीन विकास बँकेच्या सदस्यांची संख्या वाढविण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. ब्रिक्स देशांनी यापूर्वीच नवीन विकास बँकेची स्थापना केली असून ती 2015 पासून कार्यरत आहे. बँकेला निधीची आवश्यकता असून यासाठी सदस्यांची संख्या विस्तारण्याचा विचार आहे. याव्यतिरिक्त या बैठकीत ब्रिक्स कॉन्टिजन्ट रिझर्व्ह अरेजमेन्टच आणि ब्रिक्स बॉन्ड फन्ड विषयी चर्चा करण्यात आली असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

एनडीबीचा विस्तार करण्यासाठी भारताने पाठिंबा दिला आहे. नवीन सदस्यांची निवड करताना योग्य ती दक्षता येण्यात येईल. निर्धारित मुदत स्थापन करण्यापेक्षा अन्य बाबींचा विचार करण्यात येणार आहे. ब्रिक्स देशांना आपल्या देशात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी कमी पडत आहे.

Related posts: