|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिकला हरवून थिएम उपांत्यपूर्व फेरीत

ज्योकोव्हिकला हरवून थिएम उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था/ मॉन्टे कार्लो

मॉन्टे कार्लो मास्टर्स एटीपी पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रियाच्या डॉम्निक थिएमने सर्बियाच्या माजी टॉप सीडेड ज्योकोव्हिकचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्पेनचा नदाल, जर्मनीचा व्हेरेव, क्रोएशियाचा सिलीक आणि जपानचा निशिकोरी यांनी शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.

तिसऱया फेरीतील सामन्यात गुरुवारी पाचव्या मानांकित थियेमने ज्योकोव्हिकचा 6-7 (2-7), 6-2, 6-3 असा पराभव केला. गेल्यावर्षीच्या विंबल्डन स्पर्धेनंतर ज्योकोव्हिकला आत्तापर्यंत एकाही स्पर्धेत शेवच्या आठ खेळाडूत स्थान मिळवता आलेले नाही. ज्योकोव्हिकला अद्याप कोपरा दुखापतीची समस्या जाणवत आहे. थिएम आणि नादाल यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. दुसऱया एका सामन्यात स्पेनच्या राफेल नदालने रशियाच्या कॅचेनोव्हचा 6-3, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.

नदाल सध्या एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून स्वित्झर्लंडचा फेडरर दुसऱया स्थानावर आहे. नदालला आपले अग्रस्थान राखण्यासाठी मॉन्टे कार्लो स्पर्धा जिंकणे जरुरीचे आहे. नदालला गेल्यावर्षी दोनवेळा थिएमकडून हार पत्करावी लागली आहे. जमंनीच्या तृतीय मानांकित ऍलेक्सझांडेर व्हेरेवने आपल्याच देशाच्या स्ट्रफचा 6-4, 4-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने जर्मनीच्या मिश्चा व्हेरेवचा 6-2, 7-5 असा पराभव केला. क्रोएशियाच्या तृतीय मानांकित सिलीकला कोर्टवर न उतरताच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. त्याचा प्रतिस्पर्धी कॅनडाचा रेओनिक दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. जपानच्या निशिकोरीने इटलीच्या सिप्पीवर 6-0, 2-6, 6-3 अशी मात करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले.

Related posts: