|Saturday, December 15, 2018
You are here: Home » क्रिडा » नेमबाजीला वगळल्याने भारताला फटका : अभिनव बिंद्रा

नेमबाजीला वगळल्याने भारताला फटका : अभिनव बिंद्रा 

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

2022 साली होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकाराला वगळण्यात येणार असल्याने भारताला त्याचा जबरदस्त फटका बसेल, असे वैयक्तीक मत ऑलंपिक सुवर्णपदक विजेते अभिनव बिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.

नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारतीय नेमबाजांची कामगिरी अलिकडच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार होत आहे. तथापी, आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत या क्रीडा प्रकाराला वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भारताच्या अनेक नवोदीत नेमबाजांना त्याचा मोठय़ा प्रमाणात फटका बसणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे प्रमुख थॉमस बॅच यांच्या हस्ते भारताच्या ऑलिंपिक पदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अबिनव बिंद्रा यांनी वैयक्तीक वरील मत व्यक्त केले. हा समारंभ भारतीय ऑलिंपिक संघटनेतर्फे येथील सिटी हॉटेलमध्ये आयोजित केला होता.

2022 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार आहे. स्पर्धा आयोजकांनी नेमबाजी हा क्रीडा प्रकार पर्यायी म्हणून राहील. कारण याठिकाणी या क्रीडा प्रकारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेवेळी आर्थिक समस्याही अधिक राहिल, असे आयोजकांनी सांगितले. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजी या क्रीडा प्रकारात भारताने 7 सुवर्ण पदकांसह एकूण 16 पदकांची लयलूट केली. 1966 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला किंग्जस्टन येथे प्रारंभ झाला आणि 1970 च्या एडिनबर्ग येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा वगळता आतापर्यंत नेमबाजी या क्रीडा प्रकाराचा या स्पर्धेत समावेश आहे.

Related posts: