|Sunday, October 21, 2018
You are here: Home » क्रिडा » ज्युवेंटस्-नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत

ज्युवेंटस्-नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत 

वृत्तसंस्था / रोम

इटालियन सिरी ए फुटबॉल स्पर्धेत ज्युवेंटस् आणि नापोली यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. इटलीतील या फुटबॉल स्पर्धेत ज्युवेंटस् क्लबने आपली मक्तेदारी गेली काही वर्षे राखली आहे.

या स्पर्धेत ज्युवेंटस्चा संघ सलग सातव्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेत नुकत्याच झालेल्या एका सामन्यात ज्युवेंटस्ला क्रोटोनीने 1-1 असे बरोबरीत रोखले. अन्य एका सामन्यात नापोलीने युडेनेसी मिडविक संघावर 4-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला. नापोली आणि ज्युवेंटस् यांच्यातील 4 गुणांचा फरक असून नापोलीचे पाच सामने बाकी आहेत. ज्युवेंटस् संघाने सिरी ए फुटबॉल स्पर्धा यापूर्वी 1987 आणि 1990 साली जिंकली होती.

Related posts: