|Friday, January 18, 2019
You are here: Home » leadingnews » आता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा

आता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. शनिवारपासून म्हणजे आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. हुकुमशहा किंग जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी गुड न्युज आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

किम जोंग उन यांनी हा निर्णय देशहितासाठी घेतल्याचे बोलले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्याच्या उद्देशानं किम जोंग उन यांनी निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. किम जोंग उन यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. दरम्यान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात पॅन्मुन्जोम येथे भेटणार आहेत. या भेटीपूर्वीच किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतला आहे. 

Related posts: