|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » अबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी

अबू सालेमला लग्नाचे डोहाळे, मागितली 45 दिवसांची सूट्टी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कुख्यात डॉन अबू सालेमने तळोजा तुरूंग प्रशासनाकडे 45 दिवसांच्या सुट्टीचा अर्ज केला आहे. मला लग्न करायचे आहे त्यामुळे 45 दिवस सुट्टी मिळावी असे अबू सालेमने अर्जात म्हटले आहे.

मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेमचा हात आहे. तसेच खंडणी, हत्या यांसारखी प्रकरणेही त्याच्याविरोधात सुरु आहेत. मोनिका बेदी या अभिनेत्रीसोबत असलेले त्यांचे प्रेमसंबंधही जगाने जवळून पाहिले आहेत. आता हाच कुख्यात डॉन निकाह करण्यासाठी सुट्टी मागतो आहे. 1993 च्या स्फोट प्रकरणातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी असलेल्या तुरुंगात तो शिक्षा भोगतो आहे. मी अबू सालेमचा आवाज ऐकूनच त्याच्या प्रेमात पडले असे मोनिका बेदीने म्हटले होते. तसेच मोनिका बेदीला चित्रपट मिळवून देण्यातही अबू सालेमचा मोठा हात होता. ‘जानम समझा करो’, जोडी नंबर 1 या सिनेमांमधील भूमिका मिळवून देण्यात अबू सालेमने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मात्र अटक झाल्यानंतर आपण अबू सालेमला कधीही भेटलो नाही असे मोनिकाने सांगितले

 

Related posts: