|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला

पेट्रोलचा भडका, 5 वर्षाचा विक्रम मोडला 

ऑनलाईन टीम / मुंबई :
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने, भारतातील पेट्रोल,डिझेलचे दरही भडकले आहेत.पेट्रोलमध्ये 1 पैसे आणि डिझेलमध्ये 4 पैसे अशी नाममात्र वाढ झाली असलरी तरी ही दरवाढ 55 महिन्यांतील सर्वोच्च आहे.

त्याचाच परिणाम म्हणून मुंबईत पेट्रोल 81 रूपये 93 पैसे , तर डिझेल 69 रूपये 54 पैसे इतके झाले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल 74.08 रुपये लिटर आहे. सप्टेंबर 2013 नंतर ही सर्वोच्च दरवाढ आहे.तिकडे कोलकात्यात पेट्रोल 76, चेन्नईत 76.78 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. डिझेल दरानेही मोठी मजल मारली आहे. दिल्लीत डिझेल 65.31, कोलकात्यात 68.01, मुंबईत 69.54 आणि चेन्नईत 68.9 रुपयांवर पोहोचले आहे.

 

Related posts: