|Sunday, October 21, 2018
You are here: Home » leadingnews » 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशी ; मंत्रिमंडळाचा निर्णय

12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशी ; मंत्रिमंडळाचा निर्णय 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अल्पवयीन मुलींवरील वाढत्या बलात्काराच्या पार्श्वभूमीवर 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱया नराधमांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.

दिल्लीत आज कॅबिनेटची बैठक झाली. त्यात यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. कठुआ, उन्नावसह देशभरातील विविध बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याबाबत कडक धोरण घेतले आहे. त्यानुसार यापुढे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला, तर त्याला फाशीवर लटकवले जाणार आहे. त्या अनुषंगाने पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकारविरोधातील वाढती नाराजी कमी करण्यासाठी सरकारकडून डॅमेज कंट्रोल करण्यात येत असल्याचे मानले जात आहे.

 

Related posts: