|Sunday, August 19, 2018
You are here: Home » Top News » धक्कादायक ! इंदूरमध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

धक्कादायक ! इंदूरमध्ये सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार 

ऑनलाईन टीम / इंदूर :

कठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देशात खळाबळ उडाली असताना इंदूरमध्ये माणसूकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इंदूरमध्ये सहा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळय़ात सापडला आहे.

मुलीचा मृतदेह सापडल्यावर एम वाय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव झाल्याची माहिती शवविच्छेदनातून समोर आली आहे. या मुलीचे अपहरण करणाऱया व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव सूनील भील असल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्यांच्या चिमुरडला खांद्यावरून घेऊन जात असताना सुनील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ‘राजवाडा भागातील एक इमारतीच्या बेसमेंटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. राजवाडा किल्ला परिसरातून सुनीलने लहान मुलीचे सकाळी अपहरण केले होते.

 

Related posts: