|Thursday, September 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘बकेट लिस्ट’द्वारे माधुरीकडूनच शिकायला मिळाले : तेजस देऊस्कर

‘बकेट लिस्ट’द्वारे माधुरीकडूनच शिकायला मिळाले : तेजस देऊस्कर 

हिंमाशू बायस / पुणे  :

बॉलिवूडची धकधक गर्ल माध़ुरी दीक्षित ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असून, याद्वारे माधुरीकडूनच आपल्याला बरेच काही शिकायला मिळाल्याची भावना दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी शनिवारी व्यक्त केली.

येत्या 25 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून, या चित्रपटाबाबत माधुरीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर देऊस्कर यांच्याशी ‘तरुण भारत डॉट कॉम’ने संवाद साधला. तेजस देऊस्कर हे मूळचे नागपूरचे. शिक्षण घेत असताना त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. त्यानंतर हळू-हळू त्यांनी स्क्रिप्ट लिहायला सुरूवात केली आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘बकेट लिस्ट’ची स्टोरी लिहून झाल्यावर पुढील काळात माधुरी दीक्षितसोबतच हा चित्रपट करायचा, असा विचार मनात आला. तसेच माधुरीलाही स्टोरी सांगितल्यावर तिने लगेच हा चित्रपट करण्यास होकार दिला. माधुरीने बॉलिवूडमध्ये अनेक मोठे सिनेमे केले आहेत. तिच्यासोबत काम करताना दडपण नव्हते; पण जबाबदारी निश्चित होती. मुख्य म्हणजे माधुरीने माझ्यावर दडपण येऊ दिले नाही. तिच्यासोबत काम करताना खूप शिकायला मिळाले.

प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि एए फिल्मस्कडून प्रथमच हा चित्रपट सादर करण्यात येणार आहे. माधुरीने करण जोहरला या चित्रपटाविषयी माहिती दिली. या चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकल्यावर धर्मा प्रॉडक्शन आणि एए फिल्मस यांनीही या चित्रपटाच्या प्रस्तुतीचा निर्णय घेतला.

सेटवरचे माधुरीसोबतचे काही किस्से

माधुरीसोबत सेटवर खूप धमाल करायला मिळाल्याचे देऊस्कर सांगतात. रात्रीच्या वेळी आम्ही एका गावी शूटींग करत होतो. चित्रपटाला कलाटणी देणारा थोडा गंभीर सीन आम्ही शूट करत असताना रात्रभर शूटींगमुळे बाजूच्या घरात असणाऱया कोंबडय़ाची झोप न झाल्याने तो रात्रीच्या वेळी शूटींगमध्ये ओरडत होता. त्यामुळे तो गंभीर सीन नीटपणे चित्रित होत नव्हता. त्याचे रूपांतर जोकमध्ये झाले होते. मात्र, माधुरीने हा सीन गांभीर्याने पार पाडला.

बॉक्स ऑफिसवर ‘बकेट लिस्ट’ हाऊसफुल्ल होईल….

माधुरीचा हा मराठीतला पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाला करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन  आणि एए फिल्मस्चीही पहिल्यांदाच साथ मिळाली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘बकेट लिस्ट’ नक्कीच हाऊसफुल्ल होईल, अशी अपेक्षाही देऊस्कर यांनी व्यक्त केली.

 

Related posts: