|Thursday, February 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘नकळत सारे घडले’मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज

‘नकळत सारे घडले’मध्ये नेहा उठवणार शोषणाविरोधात आवाज 

कोणाचंही कुठल्याही प्रकारे शोषण होणं अयोग्यच… अनेकदा जवळच्याच, ओळखीच्याच व्यक्तींकडून असे प्रकार घडतात. त्यावेळी काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. मात्र, कोणत्याही परिस्थितीत शोषणाविरोधात न घाबरता, धैर्याने आवाज उठवलाच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा दिलीच पाहिजे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘नकळत सारे घडले’ या मालिकेतील नेहा आता शोषणाविरोधात खंबीरपणे आवाज उठवणार आहे. तिच्या प्रयत्नांना यश मिळते का, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  गेल्या काही दिवसांपासून ‘नकळत सारे घडले’ या मालिकेच्या कथानकात वेगळेच वळण आले आहे. स्वत: डॉक्टर असलेल्या नेहाच; तिच्या नणंदेचा पती संजयकडून शोषण होत आहे. मात्र, आता नेहाचा संयम संपला आहे. तिने धीराने उभे राहायचे ठरवले आहे. शोषणाविरोधात आवाज उठवण्याचा तिने निर्णय घेतला आहे. शोषणाविरोधात उभे राहण्याविषयी नेहाची भूमिका साकारणारी नुपूर परुळेकर म्हणाली, अन्याय निमूटपणे सहन करू नका. त्याच्याविरोधात आवाज उठवा, अपराध करणाऱयापेक्षा सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. कुठल्याही अन्यायाला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. स्त्राr कोणत्याही संकटावर मात करू शकते. त्यामुळे अन्याय झाला तर तो सहन न करता हाणूनच पाडला पाहिजे. असे ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेतील मीरा, अर्थात सायली देवधर म्हणाली.

   तर गोठची नायिका राधा म्हणजे रुपल नंद म्हणते, एरवी इतरांसाठी जगणारी तू, आज एकदा स्वत:साठी काहीतरी कर. स्त्राr हा किती साधा शब्द आहे नाही?…जन्म तिनेच द्यायचा, यातनाही तिनेच सहन करायच्या, पुरुषाच्या सुखात तिने सहभागी व्हायचे. पण तिच्या यातना कोण बरे सहन करू शकेल?. दुसऱयाच्या घरातील मुली किंवा स्त्रिया यांना उपभोग्य वस्तू समजणाऱया नराधमांना समज देण्याची वेळ आता आली आहे आणि हे काम आपण स्त्रियांनीच करायचे आहे. आपण खंबीर व्हायचे आहे, अशा शब्दांत शतदा प्रेम करावेच्या सायलीने, ज्ञानदा रामतीर्थकरने नेहाला पाठिंबा दिला आहे. छोटी मालकीण ऐतशा संझगिरीने सांगितले, प्रत्येक स्त्रीला स्पर्श कुठल्या हेतूने केला आहे हे ओळखता येते. जेव्हा पहिल्यांदा त्या स्पर्शाबाबत काहीतरी विचित्र जाणवते, तेव्हाच स्त्राrने प्रतिकार करायला हवा. आपल्याबरोबर होणाऱया शोषणाविरोधात नेहा कशा पद्धतीने उभी राहते हे ‘नकळत सारे घडले’ सोमवार ते शनिवार सायंकाळी 7.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.

Related posts: