|Friday, May 25, 2018
You are here: Home » मनोरंजन » ऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी

ऋषिकेश जोशी साकारणार वेडय़ा गावचा शहाणा अधिकारी 

  ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव’ अशी भन्नाट टॅगलाईन असलेल्या वाघेऱया गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे… गौरमा मीडिया अँड एंटरटेन्मेंट प्रा. लि. चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रॉडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या तसेच बॉईजसारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या आगामी ‘वाघेऱया’ या सिनेमाद्वारे ऋषिकेश जोशी झळकणार आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून ‘वाघेऱया’ नामक वेडय़ांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत तो दिसेल. समीर आशा पाटील दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्याची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.

  लग्नाच्या बोहल्यावरून थेट कामावर रुजू झालेल्या एका नवविवाहित तरुणाची कैफियत यात ऋषिकेश मांडणार आहे. आतापर्यंत सदरा, झब्बा तसेच पायजमामध्ये दिसणारा ऋषिकेश या सिनेमात मात्र शहरी लुकमध्ये पहायला मिळेल. ग्रामीण जीवनातील हलके फुलके विनोद मांडणाऱया या सिनेमात ऋषिकेशबरोबरच, किशोर कदम, भारत गणेशपुरे, सुहास पळशीकर, नंदकिशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या मराठी सिनेसफष्टीतील दिग्गज विनोदवीरांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हास्याची  तुफान आतषबाजी करणाऱया या सिनेमातील वाघेऱया गावाची गंमत 18 मे रोजी अनुभवायला मिळणार आहे.

Related posts: