|Friday, May 25, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ

चीन-उत्तर कोरिया सीमेवरील ‘लाल इमारती’चे वाढले गूढ 

आण्विक सामग्रीची निर्मिती सुरूच असल्याचा संशयृ

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

 उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांच्याद्वारे आण्विक केंद्र बंद करणे आणि आता नव्याने आण्विक चाचणी घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु  त्यांच्या घोषणेवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याची अमेरिकेची तयारी नसल्याचे समजते आणि यामागे काही कारणे आहेत. काही उपग्रहीय छायाचित्रांमुळे उत्तर कोरियाच्या उद्देशाबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचे संचालक माइक पॉम्पियो उत्तर कोरियाच्या दौऱयावर गेले असताना ही छायाचित्रे मिळविण्यात आली आहेत. ही उपग्रहीय छायाचित्रे चीनच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर कोरियाच्या हद्दीतील लाल रंगाच्या इमारतीची आहेत.

यालू नदी दोन्ही देशांच्या सीमांदरम्यान वाहते, या नदीवर दोन्ही देशांदरम्यान एक सेतू देखील उभारण्यात आला असून जो चेंग्सू भागात स्थित आहे. याच नदीच्या काठावरील एका इमारतीबद्दल अमेरिका साशंक आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱयांचे या सीमेवरील दौरे वाढले आहेत. चोंग्सूमध्ये एका लाल रंगाची इमारत दिसून आली असून तेथे अतिशुद्ध स्वरुपाचे ग्रेफाइट निर्माण केले जात असल्याचे मानले जातेय. आण्विक संयंत्रासाठी ग्रेफाइट अत्यंत आवश्यक असते. आण्विक दर्जाचे ग्रेफाइड अन्य देशांना उत्तर कोरिया विकत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला.

अमेरिकेला संशय

सीआयएने अद्याप या इमारतीबद्दल कोणत्याही प्रकारची पुष्टी दिलेली नाही. परंतु ही इमारत अमेरिकेच्या संशयाच्या भोवऱयात आहेत. उत्तर कोरियाकडून आण्विक केंद्र बंद करण्याची घोषणा करण्यात आली असून अमेरिका समवेत अनेक देशांनी याचे स्वागत केले आहे. परंतु जपानला उत्तर कोरियावर अजिबात विश्वास नाही. अमेरिकेने या मुद्यावर खबरदारी बाळगत वाटचाल करण्याची गरज आहे. उत्तर कोरियाचा या मुद्यावरील इतिहास विश्वासार्ह नाही असे अमेरिकेतील संरक्षण तज्ञ रॉबर्ट लिटवॉक म्हणाले.

अण्वस्त्रांचा साठा

उत्तर कोरियाने आण्विक केंद्र बंद करण्याबद्दल कोणताही कालावधी घोषित केलेला नाही. विविध स्रोतांच्या माध्यमातून उत्तर कोरियाजवळ 20 ते 100 अण्वस्त्रs असल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची क्षमता प्राप्त केली असून तो आता अण्वस्त्रसज्ज देश ठरला आहे.

इराण, उत्तर कोरियातील फरक

उत्तर कोरियाचे प्रकरण इराणपेक्षा काहीसे वेगळे आहे. 2015 मध्ये झालेल्या करारानंतर आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षकांनी इराणमध्ये पाहणी केली होती. तर उत्तर कोरियाने अशाप्रकारचे पाऊल कधीच उचलले नाही. संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधानंतर देखील उत्तर कोराने आण्विक कार्यक्रम चालूच ठेवला. याचबरोबर आण्विक क्षमतेशी निगडित सामग्री अनेक देशांना विकली आहे. 1990 मध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिकेदरम्यान प्लुटोनियमची निर्मिती न करण्याबद्दल करार झाला होता. सीरियात आण्विक संयंत्र उभारण्यात उत्तर कोरियाचा हात असल्याचे अमेरिकेचे मानणे आहे. हे आण्विक संयंत्र 2007 मध्ये इस्रायलने हल्ल्याद्वारे नष्ट केले होते.

 

Related posts: