|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘शाम ए गजल’ने रंगली शनिवारची सायंकाळ

‘शाम ए गजल’ने रंगली शनिवारची सायंकाळ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 शिरीश कुलकर्णी आणि गौरी कुलकर्णी यांच्या गझल गायनाने शनिवारची सायंकाळ गझलगीतात रंगली. देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात कलारसिकांच्या उर्त्स्पुत प्रतिसादात ‘शाम ए गझल’ हा संगीत कार्यक्रम पार पडला. यातून जमा झालेला निधी ग्रोथ हार्मोनडिफीसियन्सी हा अजार असलेल्या विजय जाधवला देण्यात आला.

दरम्यान, दिल के दिवारों दर पे क्या देखा या गझल ने कार्यक्रमाची सुरूवात झाली. याचबरोबर प्यार का पहला खत लिखने में, हजारो ख्वाहिशें ऐसी, रंजी ही सही, वो जो हम मे तुम मे करार था, आपकी याद वो कभी, धगधगते मन, उसळत्या लाटा, दिल को हर वक्त, ये मश्गला है, दुनिया जिसे कहते है, सबका चेहरा तेरे जैसा, झूम ले हँस बोल ले अशा आदी जगजित, चित्रा, हरिहरन, मेंहदी, गुलाम अली, रवी दाते, फरिदा परवेज, गुलबहार बानो, शिरिष यांनी गायलेल्या गझल सादर करण्यात आल्या. यास तबला साथ अनिल पुरोहित, हार्मोनिअम अभिषेक पुरोहित यांनी दिले. तर ध्वनी संयोजन रमेश सुतार, नेपथ्या मिलींद अष्ट sकर आणि सागर भोसले, प्रकाश योजना रोहन घोरपडे यांनी केले. यावेळी प्रशांत जोशी, डी. एस. कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, सुधीर अलगौंडर आदी उपस्थित होते.

 

चौकट-

 विजयच्या औषधोपचारासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन

गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रोथ हार्मोन डिफिसियन्सी या आजाराशी लढणाऱया विजयची प्रकृती बरी होत आहे. पण या अजाराच्या शेवटच्या टप्प्यासाठी उपचारास लागणारा आर्थिक खर्च दिवसेंदिवस अवाक्याबाहेर जात आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन प्रतिज्ञा संस्थेतर्फे यावेळी करण्यात आले.

Related posts: