|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी

वेगवेगळय़ा अपघातात तिघे गंभीर जखमी 

वार्ताहर /   चिकोडी

येथील करोशी मार्गावर संकेश्वर क्रॉस येथे स्विफ्ट कारला टिप्परने जोराची धडक दिल्याने एक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली. कारमधील विश्वास पांडू व्हनकडवी (रा. सत्ती ता. अथणी वय 32) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर चालक जगदीश शिवपुत्र सरीकर (वय 32 रा. एकसंबा) असे किरकोळ जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

विश्वास व जगदीश हे दोघे मित्र स्विफ्ट (क्र. केए 22 सी 5128) कारने बेळगावहून चिकोडीकडे येत होते. सदर वाहन संकेश्वर क्रॉस येथे येताच करोशीहून चिकोडीकडे येणाऱया टिप्परने (क्र. केए 49, 1998) स्विफ्ट कारला जोराची धडक दिली. दरम्यान कारच्या समोरून टिप्पर (क्र. केए 22 ए 9489) जात होता. त्यामुळे अपघातात स्विफ्ट कार दोन्ही टिप्परच्यामध्ये सापडल्याने कारचा चक्काचूर झाला.

कारची झालेली अवस्था पाहता केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघांचे प्राण वाचल्याचे घटनास्थळी जमलेल्या नागरिकांतून बोलले जात होते. धडक दिलेला टिप्परचालक फरार झाला आहे. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने जखमी दोघांनाही चिकोडी तालुका आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्याधिकारी विवेक व्हन्नोळ्ळी यांनी विश्वास  व्हनकडवीवर प्राथमिक उपचार करुन त्यास बेळगाव सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विश्वास हा बेळगाव सिव्हील हॉस्पिटलमध्ये स्कॅनिंग विभागात काम करतो. तो आपल्या मित्राच्या कारमधून चिकोडीस आल्यानंतर तेथून बसने अथणीस जाणार होता. पण मध्येच असा मोठा अपघात झाल्याने त्याला बेळगाव सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला डोके, कपाळ व डाव्या पायास मोठी दुखापत झाली आहे. सदर घटनेची नोंद चिकोडी वाहतूक पोलिसात झाली आहे.

 अपघातात सांगलीचे दाम्पत्य गंभीर

चिकोडी-अंकली मार्गावर बावान मठ येथे झालेल्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना 22 रोजी सकाळी 9 च्या सुमारास घडली. राजू बाबुराव दिगंबरे (वय 45), सुनंदा राजू दिगंबरे (वय 38 दोघेही राहणार सांगली) असे अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

सदर दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन अंकलीहून चिकोडीस येत होते. ते बावान मठ येथे आल्यानंतर दुचाकीसमोर अचानक एक महिला आडवी आली. तिला चुकविण्यासाठी राजू यांनी जोरात ब्रेक लावला. त्यामुळे दुचाकी घसरून दोघेही खाली कोसळले. यामध्ये राजू यांच्या डोक्यास जबर मार बसला असून सुनंदा यांच्या तोंडाला इजा झाली आहे. सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच दोघांनाही चिकोडी तालुका आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी दोघांनाही मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related posts: