|Thursday, January 17, 2019
You are here: Home » leadingnews » उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या प्रस्तावावर 7 निवृत्त खासदारांच्या स्वाक्षऱया असल्याने तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

तत्पूर्वी काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाच्या नोटिशीवर व्यंकय्या नायडू यांनी चर्चेची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठीच रविवारी त्यांनी ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासह संविधान आणि कायदेतज्ञाबरोबर सल्लामसलत केली होती. संविधान विशेषज्ञ सुभाष कश्यप, पी. के. मल्हो$ाासह अन्य कायदेतज्ञांकडून सल्ला मागितला होता. नायडू लवकरच विरोधी पक्षांच्या या नोटिशीवर निर्णय घेतील, अशीही चर्चा असतानाच नायडूंनी तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे. नायडू यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हैदराबादेतील त्यांचा दौरा रद्द करत कायदेतज्ञांबरोबर बैठक घेतली होती. लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, पूर्व विधी सचिव मल्होत्रा आणि न्यायिक प्रकरणाचे माजी सचिव संजय सिंह यांच्याशी या प्रकरणाचवर विचार-विमर्श केला होता. तसेच नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचंही मत जाणून घेतलं होतं. त्यानंतर आता हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

 

Related posts: