|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या

मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अहमदनगर, शहापूरनंतर आता मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करून हत्या केली आहे.

सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39चे माजी उपसाखाप्रमुख होते. त्यांच्यावर अज्ञातांनी तीन राऊंड गोळीबार केला होता.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.कुरारमधील गोकुळनगर परिसरात ही घटना घडली आहे. गोळीबारानंतर सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिह्यात पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन नेत्यांची हत्या झाली, तर कालच भिवंडीत शहापूरचे तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.

 

Related posts: